टी ट्वेन्टी विश्वकपाचा थरार २१ फेब्रुवारी पासून : अशा होणार लढती

१९.०२ । नगरी नगरी : ( Cricket ) टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतून साखळी फेरीनंतर अव्वल आठ संघांनी ‘सुपर ८’मध्ये प्रवेश…
1 Min Read 0 125

१९.०२ । नगरी नगरी :

( Cricket ) टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतून साखळी फेरीनंतर अव्वल आठ संघांनी ‘सुपर ८’मध्ये प्रवेश निश्चित केला आहे. २० संघांमधून प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ पुढे गेले असून सुपर ८ फेरी २१ फेब्रुवारीपासून १ मार्चपर्यंत रंगणार आहे. आठ संघांना प्रत्येकी चार संघांच्या दोन गटांत विभागण्यात आले आहे.

( Cricket )दोन वेळचे विजेते वेस्ट इंडिजने नेपाळवर ९ विकेट्सने विजय मिळवत सर्वप्रथम पात्रता निश्चित केली. गतविजेते भारताने पाकिस्तानवर ६१ धावांनी मात करत सुपर ८मध्ये प्रवेश केला. पाकिस्तानने नामिबियावर १०२ धावांनी मोठा विजय मिळवत अखेर सुपर ८ मध्ये जागा पक्की केली.

सुपर ८ चे गट :

🔹 गट १ : भारत, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका

🔹 गट २ : पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड, न्यूझीलंड

( Cricket ) प्रत्येक संघ आपल्या गटातील उर्वरित तीन संघांविरुद्ध सामने खेळणार असून प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. सुपर ८ मध्ये सर्व संघ शून्य गुणांसह सुरुवात करतील; साखळी फेरीतील गुण किंवा रनरेट पुढे नेले जाणार नाहीत.

गट १ सामने :

२२ फेब्रुवारी – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नरेंद्र मोदी स्टेडियम (सायं. ७ वा.)

२३ फेब्रुवारी – झिम्बाब्वे विरुद्ध वेस्ट इंडिज, वानखेडे स्टेडियम (सायं. ७ वा.)

२६ फेब्रुवारी – दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, नरेंद्र मोदी स्टेडियम (दुपारी ३ वा.)

२६ फेब्रुवारी – भारत विरुद्ध झिम्बाब्वे, एम.ए. चिदंबरम स्टेडियम (सायं. ७ वा.)

१ मार्च – झिम्बाब्वे विरुद्ध दक्षिण आफ्रिका, अरुण जेटली स्टेडियम (दुपारी ३ वा.)

१ मार्च – भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, ईडन गार्डन (सायं. ७ वा.)

गट २ सामने :

२१ फेब्रुवारी – न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान, आर. प्रेमदासा स्टेडियम (सायं. ७ वा.)

२२ फेब्रुवारी – इंग्लंड विरुद्ध श्रीलंका, पल्लेकेले स्टेडियम (दुपारी ३ वा.)

२४ फेब्रुवारी – इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान, पल्लेकेले (सायं. ७ वा.)

२५ फेब्रुवारी – न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, कोलंबो (सायं. ७ वा.)

२७ फेब्रुवारी – इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, कोलंबो (सायं. ७ वा.)

२८ फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, पल्लेकेले (सायं. ७ वा.)

उपांत्य फेरीसाठी चुरस

प्रत्येक सामना निर्णायक ठरणार असून नेट रनरेट महत्त्वाची भूमिका बजावेल. क्रिकेटप्रेमींची नजर आता सुपर ८ सामन्यांवर खिळली आहे. उपांत्य फेरीकडे वाटचाल करताना कोणते दोन-दोन संघ अंतिम चारमध्ये पोहोचतात, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

२०२८ विश्वचषकासाठी थेट पात्रता :

सुपर ८ मध्ये पोहोचलेले सर्व संघ २०२८ मध्ये ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथे होणाऱ्या पुढील टी-२० विश्वचषकासाठी थेट पात्र ठरले आहेत. सह-यजमान म्हणून ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड आधीच पात्र होते. तसेच आयसीसी क्रमवारीनुसार बांगलादेश, अफगाणिस्तान व आयर्लंड यांनाही स्थान मिळण्याची शक्यता आहे.

 

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media