४ मार्च महत्त्वाच्या घटना
१७९१: व्हरमाँट हे अमेरिकेचे १४ वे राज्य बनले.
१८३७: शिकागो शहराची स्थापना झाली.
१८६१: अमेरिकेच्या १६ व्या राष्ट्राध्यक्षपदी अब्राहम लिंकन यांची निवड झाली.
१८८२: ब्रिटन मधील पहिली इलेक्ट्रिक ट्राम पूर्व लंडन मध्ये सुरु.
१९३६: हिंडेनबर्गरचे पहिले उड्डाण झाले.
१९५१: नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन झाले.
१९६१: इंग्लंडमध्ये १९४६ साली बनवलेली विमानवाहू युद्धनौका भारतीय नौदलात आय. एन.एस. विक्रांत नावाने दाखल झाली.
१९७४: पिपल मॅगझिन चे पहिले प्रकाशन झाले.
१९८०: प्रचंड बहुमताने निवडणुका जिंकून रॉबर्ट मुगाबे हे झिम्बाब्वेचे पहिले कृष्णवर्णीय पंतप्रधान बनले.
१९९६: चित्रकार रवी परांजपे यांना कॅग हॉल ऑफ फेम हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर.
२००१: प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण केले.
२०२२: पॅराऑलिम्पिक – २०२२ हिवाळी पॅराऑलिम्पिक बीजिंग, चीन येथे आयोजित करण्यात आले आहे. बीजिंग शहर उन्हाळी आणि हिवाळी पॅरालिम्पिक दोन्हीचे आयोजन करणारे पहिले शहर बनले.
४ मार्च जन्म
१८६८: चलत चित्रपटाचे प्रवर्तक हरीश्चंद सखाराम भाटवडेकर यांचा जन्म .
१८९३: पायोनियर इन्स्ट्रुमेंट कंपनी चे सहसंस्थापक चार्ल्स हर्बर्ट कॉल्विन यांचा जन्म.
१९०६: फिशर इलेक्ट्रॉनिक्स चे निर्माते एवेरी फिशर यांचा जन्म.
१९२१: भारतीय लेखक आणि कार्यकर्ते – फन्नीश्वर नाथ रेणू
१९२२: गुजराथी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री विना पाठक यांचा जन्म.
१९२६: अॅमवे चे सहसंस्थापक रिचर्ड डेवोस यांचा जन्म.
१९३५: कॉंग्रेसच्या नेत्या प्रभा राव यांचा जन्म.
१९७३: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक चंद्र शेखर येलेती यांचा जन्म.
१९८०: भारतीय टेनिस खेळाडू रोहन बोपन्ना यांचा जन्म.
१९८६: इंस्टाग्राम चे सहसंस्थापक माईक क्रीगेर यांचा जन्म.
४ मार्च राष्ट्रीय दिन
४ मार्च हा दिवस ‘राष्ट्रीय सुरक्षा दिन’ किंवा ‘राष्ट्रीय सुरक्षितता दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम १९७२ साली मांडण्यात आला होता आणि त्यानंतर दरवर्षी हा दिवस नियमितपणे पाळला जात आहे.
‘राष्ट्रीय सुरक्षा दिन’ म्हणून ओळखला जाणारा हा दिवस आपल्या सैन्य दल, पोलीस दल आणि इतर सुरक्षा यंत्रणांमध्ये कार्यरत असलेल्या शूर पुरुष आणि महिलांना समर्पित आहे, जे राष्ट्राच्या संरक्षणासाठी सतत प्रयत्नशील असतात.