२ मार्च महत्वाच्या घटना
१८५५: अलेक्झांडर (दुसरा) हा रशियाचा झार बनला.
१८५७: जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मुंबई सुरु झाले.
१९०३: जगातील पहिले फक्त महिलांसाठी असलेले मार्था वॉशिंग्टन हॉटेल न्युयॉर्क अमेरिका येथे सुरु झाले.
१९४६: हो ची मिन्ह यांची उत्तर व्हिएतनामचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली.
१९४९: न्यू मिलफोर्ड, कनेक्टिकट येथे रस्त्यावरील स्वंयंचलित दिवे बसविण्यात आले.
१९५२: पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्घाटन झाले.
१९५६: मोरोक्को देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९६९: जगातील पहिल्या ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारया काॅन्कॉर्ड या फ्रेंच बनावटीच्या विमानाचे यशस्वी उड्डाण झाले.
१९७०: ब्रिटनकडून स्वातंत्र्य घेऊन र्होडेशिया प्रजासत्ताक बनले.
१९७८: स्वित्झर्लंडमधील दफनभूमीतुन चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली.
१९९२: आर्मेनिया, अझरबैजान, कझाकस्तान, किरगिझस्तान, मोल्दोव्हा, सॅन मरिनो, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान देश युनायटेड नेशन्स मध्ये सामील झाले.
२००१: बामियाँमध्ये अफगाणिस्तानातील बामिया शहराजवळ प्राचीन आणि अमूल्य ठेवा असलेल्या सुमारे ६,००० बुद्ध मूर्ती धर्मबाह्य ठरवून मूलतत्त्ववादी तालिबानने उखळी तोफा आणि रणगाड्यांच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यास सुरूवात केली.
२ मार्च जन्म
१७४२: नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वासराव यांचा जन्म.
१९१४: भारतीय राजकारणी, पंजाबचे आमदार – तोता सिंग
१९२५: चित्रपट आणि रंगभूमी अभिनेत्री शांता जोग यांचा जन्म.
१९३१: सोव्हिएत संघाचे शेवटचे अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांचा जन्म.
१९३१: मराठी साहित्यिक राम शेवाळकर यांचा जन्म.
१९४२: भारतीय कन्नड स्त्रीवादी लेखक – साहित्य अकादमी पुरस्कार – गीता नागाभूषण
१९७७: इंग्लिश क्रिकेटपटू अँड्र्यू स्ट्रॉस यांचा जन्म.
२ मार्च जागतिक दिन
२ मार्च हा प्रामुख्याने टेक्सास स्वातंत्र्य दिन (USA)श्रीलंका हवाई दल दिन आणि बहाई धर्मात ‘अला’ (उन्नतता) उपवासाचा पहिला दिवस म्हणून पाळला जातो.