१९ मार्च दिनविशेष

१९ मार्च महत्वाच्या घटना १८२२: बाेस्टन, अमेरिका – बोस्टन शहर म्हणून प्रस्थापित करण्यात आले. १८४८: लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या…
1 Min Read 0 11

१९ मार्च महत्वाच्या घटना

१८२२: बाेस्टन, अमेरिका – बोस्टन शहर म्हणून प्रस्थापित करण्यात आले.

१८४८: लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या प्रभाकर या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले.

१९३१: अमेरिकेतील नेवाडा राज्यात जुगाराला कायदेशीर मान्यता मिळाली.

१९३२: सिडनी हार्बर ब्रिज सुरू झाला.

२००१: वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण अफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचीत करुन कसोटी सामन्यातील पाचशेवा बळी मिळविला. कसोटी सामन्यांत ५०० बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला.

२००३: अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी इराकविरुद्ध युद्ध पुकारले.

१९२७: निराधारांच्या बहिणी (Sisters of the Destitute) – या संस्थेची स्थापना.

२०२५: सुनिता विल्यम 285 दिवसाचा प्रवास करून अंतराळातून पृथ्वीवर परत आली.

१९ मार्च जन्म

१८२१: ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर सर रिचर्ड बर्टन यांचा जन्म.

१८९७: चित्रपट संगीतकार शंकर विष्णू तथा दादा चांदेकर यांचा जन्म.

१९००: मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या (Isotopes) शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक जीन फ्रेडरिक जोलिओट यांचा जन्म.

१९३६: स्विस अभिनेत्री ऊर्सुला अँड्रेस यांचा जन्म.

१९३८: बालनाटय लेखिका आणि नामवंत चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांचा जन्म.

१९८२: फेसबुक चे सहसंस्थापक एड्वार्डो सावेरीन यांचा जन्म.

१९२४: भारतीय उद्योजक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संस्थापक पद्म विभूषण – फकीर चंद कोहली यांचा जन्म

१९२०: भारतीय पक्षीशास्त्रज्ञ आणि लेखक जफर फटहॅली यांचा जन्म

१९ मार्च विशेष दिवस :

आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन (Client’s Day) :

ग्राहकांप्रती कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी विविध सवलती व विशेष ऑफर्स देऊन ग्राहकांचा सन्मान केला जातो.

राष्ट्रीय कुक्कुटपालन दिन (भारत) :

ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्थेत कुक्कुटपालन (पोल्ट्री फार्मिंग) क्षेत्राचे योगदान अधोरेखित करण्यासाठी भारतात हा दिवस साजरा केला जातो.

इंटरनॅशनल रीड टू मी डे (International Read to Me Day) :

साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी लहान मुलांना पुस्तके वाचून दाखवण्याचा हा विशेष दिवस आहे.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media