६ मार्च महत्वाच्या घटना
१८४०: बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले.
१९०२: रेआल माद्रिद फुटबॉल क्लब ची स्थापना झाली.
१९४०: रशिया व फिनलंड मधे शस्त्रसंधी झाली.
१९५३: जॉर्जी मॅक्सिमिलानोव्हिच सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.
१९५३: मराठीतील श्रेष्ठ नाटककार आचार्य अत्रे यांनी ‘श्यामची आई’ हा चित्रपट पडद्यावर आणला.
१९५७: घाना देशाचा स्वातंत्र्य दिन.
१९६४: कॅशियस क्ले यांनी मुहम्मद अली हे नाव धारण केले.
१९७५: इराण व इराक यांच्यात सीमाप्रश्नावर संधी झाली.
१९९२: मायकेल अँजेलो हा संगणक विषाणू पसरण्यास सुरवात झाली.
१९९७: स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड.
१९९८: गझल गायक जगजितसिंग यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला.
१९९९: राष्ट्रपती के. आर. नारायण यांच्या हस्ते जगपप्रसिध्द खजुराहो मंदिर समूहाच्या सह्स्त्राब्दी सोहळ्याचे उद्घाटन झाले.
२०००: शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्कम करपात्र असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब केला.
२००५: देशातील पहिला अणुउर्जा प्रकल्प तारापूर येथे सुरु झाला.
६ मार्च जन्म
१४७५: इटालियन शिल्पकार आणि चित्रकार मायकेल अँजलो यांचा जन्म.
१८९९: चरित्रकार आणि संपादक शि. ल. करंदीकर यांचा जन्म.
१९१५: ५२ वे दाई अल-मुतलक, भारतीय आध्यात्मिक नेते – सय्यदना मोहम्मद बुरहानुद्दीन
१९३७: पहिली महिला रशियन अंतराळातयात्री व्हॅलेन्तिना तेरेश्कोव्हा यांचा जन्म.
१९३९: ओस्बोर्न कॉम्पुटर कॉर्पोरेशनचे संस्थापक – ऍडम ओस्बोर्न
१९४५: भारतीय लेखक आणि राजकारणी – सय्यद अहमद
१९४६: रिचर्ड नोबल – १,०१९.४६८ किमी/तास वेगाचा लँड स्पीड रेकॉर्ड करणारे
१९५५: बुरुंडी देशाचे ५ वे अध्यक्ष – सायप्रियन न्तार्यामिरा
१९५७: भारतीय क्रिकेटपटू अशोक पटेल यांचा जन्म.
६ मार्च राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय दिन
दंत चिकित्सक दिवस Dentist Day