५ मार्च महत्त्वाच्या घटना
१८५१ : भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण ची स्थापना झाली.
१९३१ : दुसर्या गोलमेज परिषदेपुर्वी गांधी-आयर्विन करार झाला.
१९३३ : भयानक मंदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली.
१९६६ : म्हैसूरचे राजे वाडियार यांचा बंगळुरूमध्ये असेलेला राजवाडा सरकारच्या ताब्यात घेण्याचा विधेयक मंजूर झाला.
१९८२ : सोव्हिएत प्रोब व्हेनेरा १४ शुक्र ग्रहावर उतरले.

१९९७ : संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले टपाल तिकीट प्रकाशीत झाले.
१९९८ : रशियाकडून घेतलेल्या सिंधुरक्षक पाणबुडीचे मुंबईत आगमन झाले.
२००० : कर्नाटकातील कैगा अणू वीजप्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला समर्पित केला.
२००७: राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग स्थापना
५ मार्च जन्म दिन
१५१२ : ‘गेर्हाट मार्केटर’- नकाशाकार आणि गणितज्ञ यांचा जन्म.
१८९८ : ‘चाऊ एन लाय’ – चीनचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
१९०८ : ‘सर रेक्स हॅरिसन’ – ब्रिटिश आणि अमेरिकन रंगभूमीवरील व हॉलिवूड चित्रपटांतील अभिनेते यांचा जन्म.
१९१० : ‘श्रीपाद वामन काळे’ – संपादक यांचा जन्म.
१९१३ : ‘गंगुबाई हनगळ’ – शास्त्रीय गायिका यांचा जन्म.
१९१६ : ‘बिजू पटनायक’- ओरिसाचे मुखमंत्री आणि स्वातंत्र्य सेनानी यांचा जन्म.
१९५९ : ‘शिवराज सिंह चौहान’ – मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री यांचा जन्म.
१९७४ : ‘हितेन तेजवानी’- अभिनेता यांचा जन्म.