विशेष वृत्त
मुंबई | १७.२ | नगरी नगरी
(Rte) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम अंतर्गत दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयंअर्थसहाय्यित व विना-अनुदानित शाळांमध्ये २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
(Rte) या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत १७ फेब्रुवारी ते १० मार्च २०२६ अशी निश्चित करण्यात आली असून अर्ज https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर भरता येणार आहेत.
(Rte) शालेय शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी कळविले की, या वर्षी प्रवेश प्रक्रिया राबविताना काही सुधारित सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. पालकांनी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), निवासी पुरावा इत्यादी अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.
(Rte) आरटीई कायद्यानुसार स्वयंअर्थसहाय्यित व विना-अनुदानित खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळते.
शिक्षण विभागाने पालकांना आवाहन केले आहे की, अर्ज भरताना अचूक माहिती द्यावी व अंतिम तारखेपूर्वी प्रक्रिया पूर्ण करावी. अधिक माहितीसाठी संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
Post Views: 72