आत्मा मालिकला राज्यस्तरीय विज्ञान जथ्था पुरस्कार प्रदान

कोपरगाव I प्रतिनिधी I नगरी नगरी : मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ आयोजित डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा मध्ये उत्कृष्ट…
1 Min Read 0 111

कोपरगाव I प्रतिनिधी I नगरी नगरी :

मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ आयोजित डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यालयांना दिला जाणारा राज्यस्तरीय ‘विज्ञान जथ्था’ पुरस्कार यंदा आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुलला प्रदान करण्यात आला.

गुरुकुलने विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने अव्वल कामगिरी करत राज्यात प्रथम स्थान पटकावले आहे. यावर्षीच्या स्पर्धेत गुरुकुलातील २६ विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झाली. त्यामध्ये कृष्णा लोखंडे व श्लोक कदम यांनी सुवर्णपदकासह राज्यात प्रथम क्रमांक मिळवला, तर अरव नाणेकर, राम जाधव आणि श्रेयश भवर यांनी रौप्यपदकासह द्वितीय क्रमांक पटकावला.

मुंबई येथील यशवंतराव नाट्यमंदिर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात डॉ. अशोक नगरकर यांच्या हस्ते गुरुकुलाला ‘विज्ञान जथ्था’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. मधुबाला चिंचाळकर, अच्युतराव माने, प्राचार्य निरंजन डांगे, विभागप्रमुख सचिन डांगे तसेच पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या यशाबाबत संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले की, ‘आत्मा मालिक पॅटर्न’ अंतर्गत अभ्यासक्रमाचे सूक्ष्म नियोजन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, तयारी शिबिरे, नैदानिक चाचण्या, सराव परीक्षा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाले.

विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, विभागप्रमुख सचिन डांगे, पर्यवेक्षक गणेश रासने तसेच अथर्व फाऊंडेशनचे शिवम तिवारी, शिक्षक प्रियांशू कुमार, हरीश तेली, गौरव कापडणीस आणि अभिलाषा उन्हाळे यांचे मार्गदर्शन लाभले.

    या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सरचिटणीस हनुमंत भोगळे, उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, कोषाध्यक्ष विठ्ठल होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीप भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे व श्रीमती मिरा पटेल यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media