पिंपळगाव माळवी ।१७.०२। नगरीनगरी
(Education) विद्यार्थ्यांना मोबाईल-टीव्हीपासून दूर ठेवून संस्कारक्षम पिढी घडण्यासाठी पुस्तक वाचन हाच एकमेव पर्याय असल्याचे मत माजी सरपंच राधिका प्रभुणे यांनी व्यक्त केले. कुसुमाग्रज वाचन अभियानांतर्गत गावातील मराठी शाळेत बालग्रंथालय, शिक्षक ग्रंथालय आणि स्वामी विवेकानंद वाचनालयाचे उद्घाटन आज पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या .
(Education) उद्घाटनप्रसंगी बोलताना माजी सरपंच राधिका प्रभुणे म्हणाल्या, “पुस्तकांशिवाय पर्याय नाही. वाचनामुळे मुले संस्कारित होतील.” कार्यक्रमाची सुरुवात ढोल-ताशा व लेझीमसह ग्रंथदिंडीने झाली. यात वाचनाचे महत्त्व सांगणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. मिशन आपुलकीतून १२ हजार रुपये आणि ग्रामपंचायतीतून १३ हजार रुपयांची पुस्तके ग्रंथालयासाठी देण्यात आली. सरपंच व उपसरपंच यांचेकडून एक कपाट तर शालेय व्यवस्थापन समितीकडून दोन फिरते वाचन स्टँड देण्यात आले.
(Education) शाळेत यापुढे दररोज ‘वाचन बेल’ वाजेल तेव्हा सर्व विद्यार्थी व शिक्षक अवांतर साहित्य वाचतील अशी सूचना मुख्याध्यापक गंगाधर लोंढे यांनी केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनिषा जाधव, सतिश राठोड, नयना पवार, सुजाता पुरी, अतुल वडे, रोहिणी गोटीपामुल, शैलजा सरोदे, वंदना मुळीक यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुदर्शन शिंदे यांनी केले तर आभार मनिषा कोरडे यांनी मानले.
यावेळी माजी उपसरपंच मच्छिंद्र झिने, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भागुनाथ लहारे, उपाध्यक्ष श्रावण रायकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विजय गायकवाड यांच्यासह मनोजकुमार गुंड, सागर गुंड, बंडू लहारे उपस्थित होते.
Post Views: 74