१९ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर स्वप्न साकार! राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळी ‘शाहू संग्रहालय’ उदया लोकार्पण

कोल्हापूर | २०.२ | नगरी नगरी : (Shahu Maharaj) कोल्हापूरातील कसबा बावडा येथे असलेल्या राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी अखेर…
1 Min Read 0 35

कोल्हापूर | २०.२ | नगरी नगरी :

(Shahu Maharaj) कोल्हापूरातील कसबा बावडा येथे असलेल्या राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी अखेर ऐतिहासिक ‘शाहू संग्रहालय’ साकार झाले आहे. महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते शनिवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता या संग्रहालयाचे लोकार्पण होणार आहे.

(Shahu Maharaj) ‘बावडा बंगला’ ते ऐतिहासिक संग्रहालय

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, कसबा बावडा येथील ‘बावडा बंगला’ या वास्तूत शाहू महाराजांचा जन्म झाला. या जन्मस्थळाबद्दल त्यांना विशेष अभिमान होता. त्यांनी हे ठिकाण आपल्या जनक घराण्याकडून करवीर छत्रपतींकडे घेतले होते. ज्या खोलीत त्यांचा जन्म झाला, त्या ठिकाणी संगमरवरी पाटी बसवण्याचा आदेशही त्यांनी दिला होता.

त्यांच्या निधनानंतर या वास्तूचे नामकरण ‘लक्ष्मी विलास पॅलेस’ असे करण्यात आले. करवीर संस्थान स्वतंत्र भारतात विलीन होईपर्यंत हा पॅलेस छत्रपतींचे निवासस्थान म्हणून वापरला जात होता. स्वातंत्र्यानंतर येथे शासकीय विश्रामगृह सुरू झाले.

(Shahu Maharaj) सुरक्षित स्मारक ते आधुनिक संग्रहालय

१९७४ मध्ये शाहू महाराजांच्या जन्मशताब्दीनिमित्त या वास्तूला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आला. मात्र दर्जेदार संग्रहालय उभारणीची मागणी दीर्घकाळ प्रलंबित होती.

२००८ साली मुख्य जन्मखोलीची दयनीय अवस्था पाहून इंद्रजित सावंत यांनी संवर्धनासाठी पुढाकार घेतला. वसंतराव मुळीक, डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. रमेश जाधव आणि डॉ. वसंतराव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल १९ वर्षे शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. आवश्यक छायाचित्रे, ऐतिहासिक कागदपत्रे व अभ्यासपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आली.

(Shahu Maharaj) सर्वांसाठी प्रेरणादायी मांडणी

संग्रहालयात शाहू महाराजांचे जीवनकार्य, सामाजिक न्याय, शिक्षण व समतेसाठीचे योगदान लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना समजेल अशा पद्धतीने सादर करण्यात आले आहे.

इंद्रजित सावंत यांनी महाराष्ट्रातील तसेच राज्याबाहेरील सर्व शाहू अभ्यासक व शाहूप्रेमींना लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. संग्रहालय पाहून सूचना देण्याचेही त्यांनी नमूद केले.

(Shahu Maharaj) कोल्हापूरच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा

सामाजिक न्यायाचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याची गाथा सांगणारे हे संग्रहालय कोल्हापूरच्या सांस्कृतिक इतिहासात महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार आहे. १९ वर्षांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले असून, हे संग्रहालय भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content