प्रा. संजय धोपावकर यांचा भव्य नागरी सत्कार; ‘क्रीडाधार’ स्मरणिकेचे प्रकाशन

२४.०२ अहिल्यानगर । अमोल भांबरकर । नगरी नगरी : क्रीडा क्षेत्रात निस्वार्थ व समर्पण भावनेने आयुष्य वेचून नवीन पिढी घडविणारे…
1 Min Read 0 125

२४.०२ अहिल्यानगर । अमोल भांबरकर । नगरी नगरी :

क्रीडा क्षेत्रात निस्वार्थ व समर्पण भावनेने आयुष्य वेचून नवीन पिढी घडविणारे प्रा. संजय धोपावकर यांचा सावेडी येथील माऊली सभागृहात सेवापूर्ती निमित्त भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करणाऱ्या ‘क्रीडाधार’ या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

(अहिल्यानगर) यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी प्रा. धोपावकर यांच्या कार्याचा गौरव करताना म्हटले की, क्रीडा क्षेत्रात पदके व नोकरी मिळाल्यावर थांबणे सोपे असते; मात्र निस्वार्थी वृत्तीने नवीन पिढी घडविण्यासाठी झटणारी माणसे विरळीच असतात. प्रा. धोपावकर यांचा आदर्श पुढील पिढीने घ्यावा. त्यांच्या कर्तृत्वाचे वर्णन ‘क्रीडाधार’ स्मरणिकेत प्रभावीपणे मांडण्यात आले असून, हा कार्यक्रम शहराला दिशा देणारा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

(अहिल्यानगर) माजी अप्पर मुख्य सचिव, गृह विभाग आनंद लिमये म्हणाले, “प्रा. धोपावकर यांनी क्रीडा क्षेत्राकडे कधीच व्यवसाय म्हणून पाहिले नाही; व्रतस्थ राहून त्यांनी अमूल्य योगदान दिले. शासन दरबारी त्यांचा सन्मान व्हावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.”

धनश्रीताई विखे यांनी अहिल्यानगरच्या खेळाडूंना मोठे पुरस्कार मिळवून देण्यात प्रा. धोपावकर यांचे योगदान अधोरेखित केले. त्यांच्यामार्फत खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली .

(अहिल्यानगर) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी प्रा. धोपावर यांचा शासनस्तरावर सन्मान व्हावा यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

उपमहापौर धनंजय जाधव यांनी प्रा. धोपावकर यांना अर्जुन पुरस्कार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले.

“प्रा. धोपावकर यांच्या मार्गदर्शनाखाली १३ श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू घडले.” असे सचिन जगताप यांनी अभिमानाने नमूद केले. त्यापैकी सहा ज्यूदो खेळातील असल्याचे सांगितले. क्रीडा क्षेत्रातील कार्यासाठी परिवार, सहकारी आणि पालकांचा मोठा पाठिंबा लाभल्याचे त्यांनी नमूद केले. प्रा. संजय धोपावकर यांच्या कार्यामुळे अहिल्यानगर शहर ‘खेळाचे माहेरघर’ बनावे, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली.

(अहिल्यानगर) प्रा. धोपावकर यांची कृतज्ञ भावना

सत्काराला उत्तर देताना प्रा. संजय धोपावकर म्हणाले,

“आज आयुष्यभर पुरेल एवढे कौतुक झाले. ‘क्रीडाधार’ ही खेळाडूंची संपत्ती आहे. त्यामुळे मी श्रीमंत झाल्यासारखे वाटते.”

(अहिल्यानगर) यावेळी ‘क्रीडाधार’ स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आनंद लिमये (माजी अप्पर मुख्य सचिव, गृह विभाग), सौ. धनश्रीताई विखे पाटील, महापौर सौ. ज्योतीताई गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उद्योगपती राजेंद्र चोपडा, सुमतीलाल कोठारी आदींसह क्रीडारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय या सोहळ्यास अनेक शिवछत्रपती पुरस्कार विजेते, नवोदित खेळाडू आणि क्रीडारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content