२६ फेब्रुवारी महत्वाच्या घटना
१९०९: सिनेमाकलर या पहिल्या रंगीत चित्रपट प्रथम पॅलेस थिएटर, लंडन मध्ये प्रदर्शित झाला.
१९२८: बाटून ख्रिश्चन बनलेल्या पिढीजात ख्रिश्चनांना परत हिंदु धर्मात घेण्याची सुरुवात झाली.
१९७६: वि. स. खांडेकर यांना ययाती कादंबरीसाठी मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.
१९८४: इन्सॅट-१-ई हा संपूर्ण भारतीय बनावटीचा बहुउद्देशीय भारतीय उपग्रह राष्ट्राला समर्पित केला.
१९९५: बारिंग्ज बँक ही इंग्लंडची सर्वात जुनी गुंतवणूक बँक दिवाळखोरीत निघाली.
१९९८: परळी-वैजनाथ येथील औष्णिक केन्द्राने एका दिवसात १४.७०९ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती करून वीजनिर्मितीचा (भारतातील व त्याकाळचा) नवा विक्रम नोंदवला.
१९९९: आंतरराष्ट्रीय जनुक अभियांत्रिकी व जैवतंत्रज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा. जी. पी. तलवार यांची मानाच्या समजल्या जाणार्या मास्त्रोनी-सीगल पुरस्कारासाठी निवड.
२६ फेब्रुवारी जन्म

१६३०: शीख धर्माचे ७ वे गुरु – गुरू हर राय
१८०२: जागतिक कीर्तीचे फ्रेन्च कादंबईकार, कवी आणि लेखक व्हिक्टर ह्यूगो यांचा जन्म.
१८२९: अमेरिकन लेव्ही स्ट्रॉस कंपनीचे संस्थापक लेव्ही स्ट्रॉस यांचा जन्म.
१८५२: कॉर्नफ्लेक्सचे निर्माते – जॉन हार्वे केलॉग
१८६६: अमेरिकन डाऊ केमिकल कंपनी चे संस्थापक हर्बर्ट डाऊ यांचा जन्म.
१८७४: प्रसिद्ध गुजराथी (सौराष्ट्र) कवी सूरसिंह तख्तसिंह गोहिल ऊर्फ कलापि यांचा जन्म.
१९०८: भारतीय लेखिका लीला मुजुमदार यांचा जन्म.
१९२२: चरित्र अभिनेता मनमोहन कृष्ण यांचा जन्म .
१९३१: भारतीय पत्रकार – डिकी रुतनागुर
१९३७: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचा जन्म.
१९४६: इजिप्शियन-अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पुरस्कारप्राप्त- अहमद झवेल
१९५६: झांबिया देशाचे ११वे उपराष्ट्रपती – जॉर्ज कुंडा
२६ फेब्रुवारी जागतिक दिन
#NationalPistachioDay राष्ट्रीय पिस्ता दिन
दरवर्षी २६ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय पिस्ता दिन हा पिस्ता साजरा करण्याचा खास दिवस आहे.
पिस्ता अमेरिकेत सुमारे १८८० च्या दशकात पोहोचला. मात्र मध्यपूर्वेत त्याची लागवड बायबलकालापासून केली जात आहे.