।।तुकाराम बीज, फाल्गुन
कृष्ण २।।
रूद्राक्ष माळा लाख
अंगी लावी राख,
अंतरी वखवख
शमली नाही।।
नाक दाबिती
श्वासही रोखिती
डोळे मिटती
अंतरंगी काम
शमत नाही।।
डुबक्या मारिती
नदी वा समुद्र,
वरवर भद्र
अंतरीचे अभद्र
शमले नाही।।
तुकोबाच एक
अंतर्बाह्य निर्मळ
षड्रिपुंचा जाळ
केला ज्याने।।
असोनि संसारी
अलिप्त चित्त
रोकडे एक वित्त
विठ्ठलनाम।।
केवढा विठ्ठल
केवढा तुकया
अवघे एक निराळ
ब्रह्मांडरूप।।
विठ्ठल विश्वरूप
तुकये देखिला,
माये तुझे काही काम
नाही गे माये।।
– रचना : आर. पी. कुलकर्णी.
सुमन काॅलनी, अहिल्यानगर
9850406288