टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या प्रबळ दावेदारांपैकी एका संघाचे आव्हान संपुष्टात

Balagolla । १७.०२ । नगरी नगरी (Cricket) सतत कोसळणाऱ्या पावसामुळे आयर्लंड विरुद्ध झिम्बाब्वे टी-२० विश्वचषकतील सामना रद्द करण्यात आला असून…
1 Min Read 0 104

Balagolla । १७.०२ । नगरी नगरी

(Cricket) सतत कोसळणाऱ्या पावसामुळे आयर्लंड विरुद्ध झिम्बाब्वे टी-२० विश्वचषकतील सामना रद्द करण्यात आला असून झिम्बाब्वेचा सुपर ८ मध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. पाच गुणांसह झिम्बाब्वे पुढील फेरीत पोहोचले, तर विश्वचषकाचा प्रबळ दावेदार संघ ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे.

(Cricket) सततच्या पावसामुळे आयर्लंड-झिम्बाब्वे सामना

रद्द घोषित करण्यात आला. या निकालामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला असून त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. सामन्यातील एक गुण मिळाल्याने झिम्बाब्वेचे एकूण पाच गुण झाले आणि त्यांनी सुपर ८ मध्ये स्थान मिळवले.

(Cricket) झिम्बाब्वे आणि श्रीलंकेविरुद्ध पराभव पत्करलेल्या ऑस्ट्रेलियाच्या खात्यात सध्या फक्त दोन गुण आहेत. गट टप्प्यात त्यांचा केवळ ओमानविरुद्धचा सामना बाकी होता. सुपर ८ फेरीत पोहचण्यासाठी आर्यलंडने झिम्बॉव्वेचा मोठया फरकाने पराभव करणे आणि ऑस्ट्रेलियाने ओमानविरुद्ध मोठी धावसंख्या उभारून विजय मिळवणे आवश्यक होते. मात्र आयर्लंड विरुद्ध झिम्बाब्वे हा सामनाच रद्द झाल्याने झिम्बाब्वे संघ पाच गुणांवर गेला . त्यामुळे पुढची सगळी गणिते बिघडली आणि ऑस्ट्रेलियाचा पुढील फेरीत जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला.

(Cricket) सलग दोन विजयांनी झिम्बाब्वेच्या मोहिमेला नवे वळण दिले आहे. विशेषतः ऑस्ट्रेलियावर मिळवलेला धक्कादायक विजय क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय ठरला. हा विजय नशिबावर नव्हे, तर शिस्तबद्ध खेळ, अचूक रणनीती आणि निर्णायक क्षणी दाखवलेल्या शांततेवर आधारित होता. त्यामुळे जागतिक स्तरावर कायम दुय्यम समजल्या गेलेल्या संघात नवी उभारी निर्माण झाली आहे.

(Cricket) मागील काही वर्षांतील चढ-उतारानंतर झिम्बाब्वे क्रिकेट पुन्हा संतुलन आणि उद्देश प्राप्त करताना दिसत आहे. आयर्लंडविरुद्ध प्रभावी कामगिरी केवळ पात्रता निश्चित करण्यासाठीच नव्हे, तर प्रस्थापित बलाढ्य संघांना टक्कर देण्याची क्षमता दाखवण्यासाठीही महत्त्वाची ठरली असती.

सुपर ८ मध्ये प्रवेश हा झिम्बाब्वेसाठी ऐतिहासिक ठरला आहे, कारण या आधीच्या सात प्रयत्नांत त्यांना हा टप्पा पार करता आला नव्हता. मात्र यावेळी समीकरण त्यांच्या बाजूने झुकले आहे. श्रीलंकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या पराभवानंतर झिम्बाब्वेसाठी मार्ग सुकर झाला आणि अखेर पावसामुळे सामना रद्द झाल्याने त्यांचे स्थान निश्चित झाले.

(Cricket) झिम्बाब्वेने या स्पर्धेत ‘डार्क हॉर्स’ अशी ओळख निर्माण केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध १६९ धावा करत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना १४६ धावांत रोखत २३ धावांनी संस्मरणीय विजय मिळवला होता. अशा कामगिरीमुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे.

दरम्यान, आयर्लंडने ओमानविरुद्ध दमदार फलंदाजी करत पाच बाद २३५ धावांचा डोंगर उभारला होता, जी या टी-२० विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. ९६ धावांनी विजय मिळवत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली. त्यामुळे जर आयर्लंड-झिम्बाब्वे सामना झाला असता तर एक रोमहर्षक सामना किक्रेटप्रेमींना पहायला मिळाला असता.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content