(Sports) हाय होल्टेज भारत-पाकिस्तान टी ट्वेन्टी क्रिकेट सामन्यात भारताने सात गड्यांच्या मोबदल्यात १७५ धावा केल्या. सगळ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या तारिक उमर या फिरकी गोलंदाजाला केवळ एक बळी मिळवता आला, मात्र त्याने त्याचे चार षटकांमध्ये केवळ २४ धावा देऊन भारतीय फलंदाजांना वेसण घातली .
नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा याने गोलंदाजी स्वीकारली .
(sports) अभिषेक शर्मा आणि इशान किशन ही स्फोटक जोडी मैदानात उतरली . मात्र अभिषेक शर्मा आज पुन्हा अपयशी ठरला , तो शून्यावर बाद झाला . त्यानंतर दुसऱ्या बाजुने इशान किशनने मात्र आपली फलंदाजीतील लय कायम ठेवत पाकिस्तानी गोलंदाजांना कुटून काढले . त्याने ४० चेंडूत ७७ धावा केल्या . तो बाद झाल्यानंतर मात्र षटकामागे १० धावांची सरासरी राखणाऱ्या भारताची धावसंख्या सरासरी ८ धावा प्रति षटक अशी झाली.
(sports) पाकिस्तानी कर्णधाराने पॉवर प्लेच्या सहा षटकांमध्ये फिरकी गोलंदाज खेळवण्याची चाल बऱ्यापैकी यशस्वी झाली . मात्र बहुप्रतिक्षित तारीक उमर या फिरकी गोलंदाजाला त्याने थेट ११ व्या षटकात गोलंदाजीला आणले .
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने संयमी फलंदाजी करत २९ चेंडूत ३२ धावा केल्या . त्यानंतर हार्दिक पंडयाकडून असलेल्या अपेक्षा फोल ठरल्या . मोठा फटका मारण्याच्या नादात तो शून्यावर झेलबाद झाला . शेवटच्या षटकात रिंकू सिंगने केलेल्या फटकेबाजीमुळे ७ बाद १७५ अशी समाधानकारक धावसंख्या भारताला उभी करता आली .
आता भारतीय फिरकी गोलंदाजीवर सामन्याचे भवितव्य अवलंबून आहे . दरम्यान शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पहिल्याच षटकात हार्दिक पांडया याने साहेबजादा फरहान याला शून्यावर बाद करत सामना चुरशीचा होणार याचे संकेत दिले आहेत .
नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.