अहिल्यानगर । १२.०२ । नगरी नगरी :
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या मार्गदर्शनाखाली येथील न्यू लॉ कॉलेज, अहिल्यानगर यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारी कॉ. बापूसाहेब भापकर राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा शनिवार दि. १४ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. गेल्या अठरा वर्षांपासून ही स्पर्धा सातत्याने घेतली जात असून राज्यभरातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थी या स्पर्धेची उत्सुकतेने वाट पाहत असतात.
या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ. सुभाष लांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे सचिव अॅड. विश्वासराव आठरे पाटील राहणार आहेत.
स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ त्याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजता होणार असून संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे यांच्या हस्ते पार पडणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर असतील.
वक्तृत्व स्पर्धा शनिवार, दि. १४ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता सुरू होणार असून विद्यार्थ्यांसाठी पुढील विषय निश्चित करण्यात आले आहेत –
१) लोकशाहीचा आधारस्तंभ : समाजमाध्यमे
२) कृत्रिम बुद्धिमत्ता व मानवी भवितव्य
३) कायदे समाजासाठी हवेत की समाज कायद्यांसाठी हवा : भारतीय समाजजीवनातील वास्तव
४) आत्मनिर्भर भारत आणि महिला सक्षमीकरण
५) राष्ट्रनिर्माणात युवकांची भूमिका
या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महाविद्यालयांनी दूरध्वनी क्र. (०२४१) २३२४०७४ किंवा स्पर्धेचे समन्वयक प्रा. डॉ. रामेश्वर दसुंगे (मो. ७२४९७४०५७५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. एम. एम. तांबे यांनी केले आहे.