अहिल्यानगर I प्रतिनिधी । नगरी नगरी :
सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रशी गेल्या दशकभरापासून घट्ट नातं जपणारे आणि राज्यातील सायकलिंग चळवळीचे एक भक्कम आधारस्तंभ ठरलेले प्रविण व्ही.पाटील यांची महासंचालक आणि कार्यकारी अधिकारी म्हणून राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची पदी सायकलिंग असोसिएशन ऑफ इंडिया मध्ये नियुक्ती झाली.ही महाराष्ट्रातील सायकलिंग क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.1 एप्रिल 2026 पासून नवी दिल्ली येथे पदभार स्वीकारला आहे.
सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या दृष्टीने ही केवळ वैयक्तिक यशाची बाब नसून,संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि राज्यातील सायकलिंग खेळासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे.
गेल्या 10 वर्षांत प्रविण पाटील यांनी संघटनेसोबत काम करताना सायकलिंगच्या विकासासाठी सातत्याने योगदान दिले आहे.ते संघटनेचे एक भक्कम आधार स्तंभ राहिले असून, कै.प्रताप जाधव यांच्या सहकार्याने महाराष्ट्रात सायकलिंगसाठी मजबूत पायाभूत सुविधा उभारण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.तसेच,एशियन सायकलिंग कोनफिडीशन माजी जनरल सेक्रेटरी सरदार ओंकार सिंग पाटील,फेडरेशन ऑफ इंडिया अध्यक्ष पंकज सिंग आणि जनरल सेक्रेटरी मनिंदर पाल सिंग यांनी भारतीय सायकलिंगसाठी घातलेल्या भक्कम पायाभरणीचे सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तर्फे विशेष कौतुक करण्यात येते.
नव्या जबाबदारीच्या प्रवासात प्रविण पाटील यांच्यासोबत अजीत सिंग (टेक्निकल डायरेक्टर), डॉ.धर्मेंद्र लांबा,अंकाक्षा दहात,प्रिया चिप आणि राकेश कुमार आदी सक्षम टीम कार्यरत आहे.
सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी देखील या यशाबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.मा.ना.श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेब महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री लातूर जिल्हा,संघटनेचे अध्यक्ष अँड.विक्रम रोठे, उपाध्यक्ष अविनाश कदम,यशवंत नडगम, धनंजय वानखेडे,अभिजीत मोहिते तसेच मानद सचिव प्रा.संजय साठे आणि खजिनदार भिकन अंबे,प्रा. साईनाथ थोरात यांनी प्रविण पाटील यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रला पूर्ण विश्वास आहे की प्रविण. व्ही. पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सायकलिंग नव्या उंचीवर पोहोचेल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा अधिक उंच फडकवेल. सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र च्या सर्व पदाधिकारी व खेळाडू यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.