उन्हाच्या तडाख्यात चिमुकल्यांचा ‘ठंडा ठंडा, कूल कूल’ जल्लोष

अहिल्यानगर । नगरी नगरी : रविवारी नगर शहराचे तापमान तब्बल ४२ अंशांवर पोहोचल्याने उन्हाच्या झळा नागरिकांना असह्य होत असताना, गजराज…
1 Min Read 0 184

अहिल्यानगर । नगरी नगरी :

रविवारी नगर शहराचे तापमान तब्बल ४२ अंशांवर पोहोचल्याने उन्हाच्या झळा नागरिकांना असह्य होत असताना, गजराज नगर परिसरातील दोन चिमुकल्यांनी मात्र या कडक उन्हावर स्वतःची भन्नाट शक्कल लढवली. घरासमोरील पाण्याने भरलेल्या टबमध्ये बसून त्यांनी छोट्याशा स्विमिंग पूलचा आनंद घेत थंडगार पाण्यात मनसोक्त खेळत उन्हाळ्यालाच जणू गारवा दिला.

उन्हामुळे त्रस्त झालेल्या वातावरणात या चिमुकल्यांचा निरागस आनंद पाहून परिसरातील नागरिकांच्या चेहऱ्यावरही हसू उमटले. महागड्या साधनसामग्रीशिवायही बालमन आपल्या छोट्या जगात आनंदाचे क्षण कसे शोधते, याचे हे सुंदर चित्र पाहायला मिळाले.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media