८ एप्रिल महत्वाच्या घटना :
१८३८: द ग्रेट वेस्टर्न हे वाफेवर चालणारे जहाज ब्रिस्टॉल (इंग्लंड) येथून निघून १५ दिवसांत न्यूयॉर्कला पोहोचले — अटलांटिक महासागर पार करणारी पहिली आगबोट.

१८५७: मंगल पांडे यांना फाशी देण्यात आली.

१९११: हाइक ओन्नेस यांनी अतिसंवाहकतेचा शोध लावला.
१९२१: विनोबा भावे यांनी वर्धा येथे पवनार आश्रमाची स्थापना केली.
१९२९: भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट केला.

१९५०: भारत-पाकिस्तान दरम्यान लियाकत-नेहरू करार झाला.
१९९३: मॅसेडोनियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रांत सामील झाले.
२००५: पोप जॉन पॉल दुसरे यांच्या अंत्ययात्रेत सुमारे ४० लाख लोक सहभागी झाले.
२०२४: झिम्बाब्वे देशाने झिम्बाब्वे गोल्ड हे नवीन चलन सुरू केले.
🎂 ८ एप्रिल जन्मदिन
१३६३: तैमूरलंग यांचा जन्म.
१८९२: मेरी पिकफोर्ड — अमेरिकन चित्रपटसृष्टीतील अग्रणी अभिनेत्री.
१८९२: रिचर्ड न्यूट्रा — प्रसिद्ध आर्किटेक्ट.
१९२४: कुमार गंधर्व (शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ) यांचा जन्म.

१९२८: रणजित देसाई — नामवंत मराठी साहित्यिक.
१९३८: कोफी अन्नान — संयुक्त राष्ट्रांचे ७ वे महासचिव.
१९५०: विजय मोहंती — राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते.
८ एप्रिल जागतिक दिवस :
आंतरराष्ट्रीय रोमा दिवस (International Romani Day): रोमा समुदायाच्या हक्कांसाठी आणि त्यांच्यावरील अन्यायाकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

प्राणीसंग्रहालय प्रेमी दिन (Zoo Lovers Day) :
प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांबद्दल प्रेम आणि जनजागृती वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
‘नॅशनल ऑल इज अवर्स डे’ (National All Is Ours Day): निसर्ग आणि आपल्या सभोवतालच्या गोष्टींचे कौतुक करण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.