अहिल्यानगर । मार्केटिंग प्रतिनिधी । नगरी नगरी –
शहरातील फॅशनप्रेमींसाठी आणि आगामी विवाहसोहळ्यांची तयारी करणाऱ्यांसाठी एक खास पर्वणी ठरणारे ‘रंगोली मेगा फॅशन अँड लाइफस्टाइल एक्झिबिशन – समर अँड वेडिंग एडिट’ याचे आयोजन २९ आणि ३० एप्रिल २०२६ रोजी करण्यात आले आहे. शहरातील हॉटेल यश ग्रॅण्ड येथे होणाऱ्या या प्रदर्शनात भारतभरातील ६० हून अधिक नामांकित एलिट डिझायनर्स सहभागी होणार असून, लक्झरी फॅशनचा अनोखा अनुभव नागरिकांना घेता येणार आहे.
‘रंगोली’ प्रदर्शनाचे हे १५ वे पर्व असून, प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही आधुनिकता आणि परंपरेचा सुंदर मिलाफ येथे पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, लग्नसराई आणि उन्हाळी हंगाम लक्षात घेऊन डिझायनर साड्या, बिस्पोक लेहेंगा, ब्रायडल कुट्युर, फेस्टिव्ह वेअर, टेंपल ज्वेलरी, डायमंड आणि सिल्व्हर कलेक्शन, तसेच लक्झरी अॅक्सेसरीज आणि होम डेकोर यांचे आकर्षक संकलन या प्रदर्शनात उपलब्ध असणार आहे.
या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘तुमच्या वेडिंग आणि समर स्टाइलसाठी सर्व काही — एकाच छताखाली’ ही संकल्पना. नववधूंसाठी खास डिझाईन केलेले पोशाख, कुटुंबातील सदस्यांसाठी आकर्षक पेहराव, तसेच घर सजावटीसाठी उच्च दर्जाच्या वस्तू यामुळे हे प्रदर्शन महिलांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
दोन दिवस चालणारे हे प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत खुले राहणार असून, प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील फॅशनप्रेमी, नववधू-वर पक्ष आणि लाइफस्टाइलमध्ये नवे ट्रेंड शोधणाऱ्या नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
लक्झरी, स्टाईल आणि आधुनिकतेचा मिलाफ अनुभवण्यासाठी ‘रंगोली मेगा फॅशन अँड लाइफस्टाइल एक्झिबिशन’ हे प्रदर्शन अहिल्यानगरकरांसाठी यंदाच्या उन्हाळ्यातील एक विशेष आकर्षण ठरणार आहे.
संपर्क – ९५२९९०२७१८ / ९३२५७१४२४९ / ६२६४०३८०४४
( आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आमच्या मार्केटिंग प्रतिनिधीशी संपर्क साधा – 8208883477 )