(Education) गदेवाडी फाटा, चापडगाव (ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) येथील सचेतन इंग्लिश स्कूलचे कार्य कौतुकास्पद असून ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण देण्याचे काम शाळा करीत असल्याचे प्रतिपादन प्रमुख पाहुणे राहुल राजळे यांनी केले. शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.
(Education) कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद घनवट यांनी प्रास्ताविकात शाळेच्या शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक प्रगतीचा आढावा घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
(Education) स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी गाणी, समूह नृत्य, एकांकिका, एकपात्री अभिनय, देशभक्तीपर सादरीकरण, बालगीते व लोकगीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सुमारे २०० विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे संपूर्ण प्रांगणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
वर्षभरात विविध शैक्षणिक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा व परिक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. बक्षिसे देताना प्रमुख पाहुणे राहुल दादा राजळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राहुल राजळे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ह.भ.प. झिरपे महाराज होते. यावेळी आदिनाथ कृषी विकास प्रतिष्ठानचे सेक्रेटरी भास्कर गोरे, केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक त्रिंबक दराडे, सरपंच आप्पा मडके, ज्ञानदेव घोडेराव, अशोक तानवडे, दिलीप विखे, अफसर शेख, पुरुषोत्तम भापकर, युवा उद्योजक पांडुरंग नवले, सुरेश नेमाने, अभय गोरे, डॉ. घुले, चेडे साहेब तसेच परिसरातील विविध गावांचे सरपंच व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुख्याध्यापक अर्चना घनवट यांनी केले. शिक्षक प्रमोद हिवाळे, वर्षा लाहासे, गणेश वंजारी, रामकृष्ण रंगवाल, केशव वाघमारे, मनीषा गोरे तसेच कर्मचारी मिराबाई मडके, अमोल पातकाळ, गणेश बनकर, बाबासाहेब कर्डिले, भागवत तांदळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ व मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली.
नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.
अहिल्यानगर। १७.०२। अमोल भांबरकर : (निवड) अहिल्यानगर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेच्या नुकत्याच झालेल्या सहविचार सभेत ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब बोडखे…
१८२२: जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे अहमदाबाद येथे उद्घाटन झाले. १९१८: इस्टोनिया देशाला रशियापासुन स्वातंत्र्य मिळाले. १९२०: नाझी पार्टीची स्थापना झाली.…