२५ फेब्रुवारी घटना :
१५१०: पोर्तुगीज सरदार अल्बुकर्क याने अकस्मात हल्ला करुन पणजीचा किल्ला जिंकला.
१८१८: ले. कर्नल डिफनने चाकणचा किल्ला उध्वस्त केला. दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतील बहुतेक सर्व किल्ल्यांची मोडतोड केली.
१९३५: फॉक्स मॉथ विमानाद्वारे मुंबई – नागपूर – जमशेदपूर या मार्गावरील हवाई टपाल सेवेला प्रारंभ झाला.
१९४५: दुसरे महायुद्ध – अमेरिकन विमानवाहू नौकांनी टोकियोवर बॉम्बहल्ला केला.
१९४५: दुसरे महायुद्ध – तुर्कस्तानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
१९६८: मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी भारताचे ११ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९८६: २० वर्षे राज्य केल्यानंतर फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनी जनआंदोलनाच्या रेट्यामुळे सत्ता सोडुन देशातुन पलायन केले.
१९९६: स्वर्गदारातील तार्याला (Star in the gate of heavens) वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले.
२५ फेब्रुवारी जन्म :
१७७८ : पेरू देशाचे पहिले अध्यक्ष – जोस डे सान मार्टिन
१८४० : बालवाङ्मयकार विनायक कोंडदेव ओक यांचा जन्म.
१८९४ : आध्यात्मिक गुरू अवतार मेहेरबाबा यांचा जन्म.
१९३८: भारतीय क्रिकेट खेळाडू आणि पंच फारूक इंजिनिअर यांचा जन्म.
१९४३: बीटल्स चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक जॉर्ज हॅरिसन यांचा जन्म.
१९४८: चित्रपट अभिनेते डॅनी डेंग्झोप्पा यांचा जन्म.
१९७४: हिन्दी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री दिव्या भारती यांचा जन्म.
२५ फेब्रुवारी जागतिक दिन :
फिलिपिन्समध्ये ऐतिहासिक ‘EDSA पीपल पॉवर क्रांती’ वर्धापन दिन साजरा केला जातो .