श्री क्षेत्र मोहटादेवीगड येथे वासंतिक नवरात्रोत्सवाची भव्य सांगता

अहिल्यानगर | प्रतिनिधी l नगरी नगरी : श्री क्षेत्र मोहटादेवी गड येथे वासंतिक नवरात्रोत्सवाची होमहवन, कुमारिका पूजनाने भक्तिमय वातावरणात वासंतिक…
1 Min Read 0 87

अहिल्यानगर | प्रतिनिधी l नगरी नगरी :

श्री क्षेत्र मोहटादेवी गड येथे वासंतिक नवरात्रोत्सवाची होमहवन, कुमारिका पूजनाने भक्तिमय वातावरणात वासंतिक नवरात्रोत्सवाची अत्यंत उत्साहपूर्ण आणि धार्मिक वातावरणात सांगता करण्यात आली. श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर (पाथर्डी, अहिल्यानगर) वासंतिक (चैत्र) नवरात्र महोत्सव १९ मार्च ते २७ मार्च २०२६ या कालावधीत संपन्न झाला. मोहटादेवी गडावर चैत्र आणि शारदीय अशा दोन्ही नवरात्रोत्सवांना विशेष महत्त्व असते.

नऊ दिवस चाललेल्या या पवित्र उत्सवाचा समारोप देवस्थानचे विश्वस्त शशिकांत दहिफळे, शुभम दहिफळे तसेच अॅड. ऋतीका कराळे यांच्या हस्ते विधिवत होमहवन करून करण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसर मंत्रोच्चार, धूप-दीप आणि वेदमंत्रांच्या गजराने भारावून गेला होता.

नवरात्रोत्सवाच्या काळात दररोज विविध धार्मिक विधी आणि पूजाअर्चा पार पडल्या. यात शांतीपाठ, महासंकल्प, पुण्याहवाचन, चंडी याग हवन, चौसष्ट योगिनी, दशमहाविद्या, अष्टभैरव यांसह अनेक देवतांची विधिवत पूजा करण्यात आली. तसेच अभिषेक, षोडशोपचार पूजन आणि अखेरच्या दिवशी कुमारिका पूजन करून देवीची आराधना करण्यात आली. कुमारिका पूजनामध्ये लहान मुलींना देवीचे स्वरूप मानून त्यांची पूजा करून त्यांना वस्त्र, फळे आणि प्रसाद देण्यात आला.

उत्सवाच्या सांगता दिनी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसरात भक्तांची रांग लागली होती. अनेक भाविकांनी नवस फेडण्यासाठी व विशेष पूजेसाठी हजेरी लावली. होमहवनाच्या वेळी वातावरणात आध्यात्मिक ऊर्जा आणि शांततेचा अनुभव भाविकांना लाभला.

वासंतिक नवरात्र, ज्याला चैत्र नवरात्र असेही म्हणतात, हे हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण पर्व मानले जाते. आत्मशुद्धी, नवचैतन्य आणि नवीन संकल्पांची सुरुवात यांचे प्रतीक म्हणून या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. या निमित्ताने सकल देशवासीयांच्या उत्तम आरोग्य, समृद्धी आणि सुखासाठी महासंकल्प करून प्रार्थना करण्यात आली.

नवरात्राचे धार्मिक महत्त्व: वासंतिक नवरात्र हा शक्तीपूजेचा महत्त्वाचा कालावधी असून, देवी दुर्गेच्या विविध रूपांची आराधना केली जाते.

कुमारिका पूजनाचे महत्त्व: कुमारिका पूजनात लहान मुलींना देवीचे स्वरूप मानले जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे.

होमहवनाचे वैज्ञानिक महत्त्व: होमहवनामुळे वातावरण शुद्ध होते, सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मानसिक शांतता लाभते, असे मानले जाते.

सामाजिक उपक्रमांचे महत्त्व: धार्मिक उत्सवांसोबत सामाजिक उपक्रम राबवल्याने समाजात एकात्मता आणि सहकार्याची भावना दृढ होते.

या सोहळ्यास देवस्थानचे विश्वस्त अॅड. विक्रम वाडेकर, बाळूशेठ लाहोटी, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, लता दहिफळे, योगीता दहिफळे, कावेरी लाहोटी, पूजा वाडेकर, संतोष शर्मा, प्रसाद कुलट यांच्यासह ग्रामस्थ, कर्मचारी व मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे पौरोहित्य नारायण देवा सुलाखे, भुषणदेवा, निखील सुलाखे, महेश झेंड, विशाल किडे, शुभम जोशी, सिध्देश्वर रामदासी, विशाल सुलाखे आणि भगवान जोशी यांनी अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडले.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड (किवळे) येथील उद्योजक चंद्रशेखर कातळे व नगरसेविका रेश्मा बापुजी कातळे परिवाराच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत उपक्रम राबवण्यात आला. मोहटे येथील रेणुका विद्यालयातील विद्यार्थिनींना वस्त्रदान, कुमारिका पूजन व अन्नदान करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि सामाजिक एकात्मतेचा संदेशही देण्यात आला.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media