२७ मार्च दिनविशेष

२७ मार्च महत्वाच्या घटना : १६६७: शिवरायांना सोडुन गेलेल्या नेताजी पालकरचे औरंगजेबाने धर्मांतर केले व यांचे नाव महंमद कुली खान…
1 Min Read 0 129

२७ मार्च महत्वाच्या घटना :

१६६७: शिवरायांना सोडुन गेलेल्या नेताजी पालकरचे औरंगजेबाने धर्मांतर केले व यांचे नाव महंमद कुली खान ठेवले.

१७९४: अमेरिकन नौदलाची स्थापना झाली.

१८५४: क्रिमियन युद्ध – इंग्लडने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.

१९५८: निकीता क्रुश्चेव्ह सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.

१९६६: २० मार्च रोजी चोरीला गेलेला फुटबॉलचा विश्वचषक दक्षिण लंडनमधील एका बागेत पिकल्स नावाच्या कुत्र्याला सापडला. त्यानंतर हा चषक १९८३ मधे पुन्हा चोरीला गेला, तो आजतागायत सापडलेला नाही.

१९७७: तेनेरिफ द्वीपावरील धावपट्टीवर पॅन अ‍ॅम आणि के. एल. एम. या दोन बोईंग ७४७ प्रकारच्या विमानांची टक्कर होऊन ५८३ जण ठार झाले.

१९९२: पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान.

२०००: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर.

२७ मार्च जन्म :

१४१६: इटालियन तपस्वी आणि संत, ऑर्डर ऑफ द मिनिम्सचे संस्थापक पाओला च्या फ्रान्सिस यांचा जन्म.

१७८५: फ्रान्सचा राजा लुई (सतरावा) यांचा जन्म.

१८४५: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विलहेम राँटजेन यांचा जन्म.

१८६३: रोल्स-रॉइस लिमिटेड चे निर्माते हेन्री रॉयस यांचा जन्म.

१९०१: डोनाल्ड डक चे हास्यचित्रकार कार्ल बार्क्स यांचा जन्म.

२७ मार्च जागतिक दिवस :

जागतिक रंगभूमी दिन ( World Theater Day )

रंगभूमीचे महत्त्व जगापर्यंत पोहोचावे आणि लोकांमध्ये त्याविषयी रुची निर्माण व्हावी, या उद्देशाने दरवर्षी २७ मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात १९६१ मध्ये झाली.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content