आकाशवाणी@90 उपक्रमाअंतर्गत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आणि न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात संपन्न

अहिल्यानगर | प्रतिनिधी | ५.०६ : आकाशवाणीच्या ९० वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त राबविण्यात येत असलेल्या “आकाशवाणी@90” उपक्रमांतर्गत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आणि…
1 Min Read 0 67

अहिल्यानगर | प्रतिनिधी | ५.०६ : आकाशवाणीच्या ९० वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त राबविण्यात येत असलेल्या “आकाशवाणी@90” उपक्रमांतर्गत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आणि न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर येथील संज्ञापन अभ्यास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या स्पर्धेत संज्ञापन अभ्यास विभागाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सुदाम बटुळे यांनी प्रास्ताविकातून “आकाशवाणी@90” या विशेष उपक्रमाची माहिती दिली. त्यानंतर आकाशवाणी अहिल्यानगरचे कार्यक्रम प्रमुख मुजम्मिल पटेल यांनी मार्गदर्शन करताना बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंगत राहून आकाशवाणीने समाजमाध्यमे, मोबाईल अॅप, पॉडकास्ट तसेच वेव्हज् (WAVES) ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी प्रयत्न सुरू ठेवले असल्याचे सांगितले.

यावेळी संज्ञापन अभ्यास विभाग प्रमुख प्रा. संदीप गिऱ्हे, डॉ. बापू चंदनशिवे, प्रा. अभिजित गजभिये आणि प्रा. श्वेता बंगाळ उपस्थित होते. प्रा. संदीप गिऱ्हे यांनी आपल्या मनोगतात आकाशवाणी आणि भारतीय समाज यांचे गेल्या नऊ दशकांपासून अतूट नाते राहिले असून माहिती, शिक्षण आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात आकाशवाणीचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद केले.

स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना आकाशवाणीच्या वतीने स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अतुल सातपुते, वृषाली घनवट, भारती कुलकर्णी, शीतल ठोंबरे आणि प्राची वाडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि आकाशवाणीविषयीच्या उत्सुकतेमुळे हा उपक्रम संस्मरणीय ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media