अहिल्यानगर । प्रतिनिधी । नगरी नगरी :
बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी अपुर्वा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आणि युवाशक्ती फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर विभागातील बेरोजगार युवकांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात महाराष्ट्रातील व देशातील नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधील दोन हजारांपेक्षा अधिक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
हा रोजगार मेळावा २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत आयोजित करण्यात आला असून, मोठ्या संख्येने युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या मेळाव्यात निवड झालेल्या उमेदवारांना मासिक १५ ते ३० हजार रुपये वेतन, तसेच जेवण, चहा, नाश्ता आणि बस सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय आठ तासांची कामाची वेळ आणि अतिरिक्त वेळेस वेगळा मोबदला देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
मेळाव्यासाठी १८ ते ३५ वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र असून, दहावी, बारावी उत्तीर्ण, कोणत्याही शाखेतील पदवीधर, आयटीआय सर्व व्यवसाय, विद्युत व यांत्रिक पदविका, अभियांत्रिकी, सीएनसी चालक तसेच सीआयपीईटी अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांसाठी हा मेळावा महत्त्वाची संधी मानला जात असून, विविध क्षेत्रांतील कंपन्या एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने उमेदवारांना थेट मुलाखतीची संधी मिळणार आहे.
हा मेळावा अपुर्वा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, सिद्धीबागेसमोर, न्यू आर्ट्स कॉलेज रोड, दिल्लीगेट, अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे तसेच
अधिक माहितीसाठी ९९२२०७९१३१, ८०१०८६६४६५ आणि ९६०७९६५७४२ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.